https://www.loksatta.com/pune/54-courses-across-the-country-from-ncert-pune-amy-95-4323918/
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये स्थानिक भाषा, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने एनसीईआरटीने देशभरातील ५४ स्थानिक भाषांत पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करून प्रसिद्ध केला आहे. या भाषांमध्ये राज्यातील खान्देशी भाषेचाही समावेश असून, या खान्देशी अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना खान्देशी भाषेतील अक्षरे, शब्द आणि अंकांचे उच्चार, लेखन शिकता येणार आहे.” – बातमी
या निर्णयाच्या अंमलबजावणीने धोरणाचा मूळ हेतू साध्य झाला तर उत्तमच पण त्या निमित्ताने विद्यार्थ्यांना, ‘माझी माय सरसोती माले शिकवते बोली…!’ म्हणणाऱ्या बहिणाबाईंना जाणता आले तरी मोठीच उपलब्धी म्हणायची. बहिणाबाई किंचित जरी आकळल्या तर पामरांना जगणे बऱ्यापैकी कळायची सोय…!
नाहीतर आहेच, ‘बाबू, सी दॅट बिग ट्री विथ इट्स हेअर्स हँगिंग डाउन? इट इज कॉल्ड बन्यान ! से विथ ममा, ‘बन्यान’…!