Et Cetera

आत्मविमोह…!

  • समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे न बघणे, नजरेला नजर न देणे.
  • दुसऱ्याकडे बघून स्मितहास्य न करणे.
  • भाषेचा विकास अतिशय विलंबाने वा अजिबात न होणे.
  • समोरच्याने बोललेलेच पुन्हा बोलणे.
  • स्वतःतच मग्न असणे.
  • अन्य व्यक्तींचे विचार, माहिती, भावना वेगळ्या असू शकतात हे माहीत नसणे.
  • मैत्री करता / टिकवता न येणे.
  • एकट्यानेच तोच- तोच खेळ खेळत राहणे.
  • परिस्थितीत बदल झाल्यास अस्वस्थ होणे.
  • एखादी गोष्ट पसंत नसल्यास रडून गोंधळ घालणे.
  • एकाच गोष्टीत नको इतका रस दाखविणे. 
  • सामान्य ज्ञान कमालीचे तोकडे असणे.
  • अतिक्रियाशील वा अतिमंद असणे.

कृपया गैरसमज नसावा. एका अभ्यास अहवालाच्या कामासंदर्भांत सापडलेली ‘ऑटिजम’ अर्थात स्वमग्नता, आत्मविमोह या मानसिक स्थितीच्या काही लक्षणांची ही सूची. सांप्रत काळी आजूबाजूला आढळणाऱ्या बहुतांश मनुष्यप्राण्यांत ही लक्षणे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, त्याला कुठलाही वेगळा संदर्भ जोडू नये अथवा स्मार्टफोन, (स)माजमाध्यमे, सामाजिक/ राजकीय परिस्थिती यांच्याशी त्याचा संबंध शोधू नये ही कळकळीची विनंती!

शुभम भवतु !

Leave a comment