NGO and CSR

‘सावली’ला हवंय छत…!  

सावलीच्या विस्तारणाऱ्या क्षितिजाला योगदानासाठी नितेशचे आवाहन त्याच्याच शब्दात…  

प्रिय स्नेही, नमस्कार!

सावली ही अहमदनगर स्थित सेवाभावी प्रकल्प आहे. गेली तेवीस वर्ष आई वडील नसलेली, निराधार, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची, एक पालक असलेल्या मुलांची घरासारखी योग्य काळजी घेण्यात यावी यासाठी मनापासून दर्जेदार सेवांमार्फत प्रयत्नशील आहे. आज पर्यंत जवळजवळ १,५०० (एक हजार पाचशे ) निराधार मुलं, मुली सावली मधून उत्तम नागरिक होऊन बाहेर पडले आहेत.

आमच्या कामाचे कौतुक आत्ता पर्यंत कवी प्रवीण दवणे, गप्पाष्टककार संजय उपाध्ये, ज्येष्ठ विचारवंत साहेबराव अवारे, गांधीवादी डॉ . सुगण बरंठ, लेखक हेरंब कुलकर्णी, अनिकेत आमटे, स्वयं टॉक संस्थापक अनिल काळे, हेमा काळे, अलका मांडके, रश्मी भातखळकर, विश्वास नांगरे, कृष्ण प्रकाश, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आयुक्त पंकज जावळे, आल्हाद काशीकर, मनीष पुराणिक, विजय तांबे, अभिनेते चिन्मय मांडलेकर, प्रकाश धोत्रे, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, पत्रकार महेंद्र मुंजाळ, उद्योजक दीपक घैसास, प्रभाकर गाणू परिवार, राजेंद्र जोशी, मुंबई, अविनाश सावजी, छायाताई फिरोदिया, पोपटराव पवार, स्माईल फौंडॆशन, मुंबई तसेच अहमदनगर मधील पत्रकार मित्र, सामाजिक, राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रातील पाच हजाराहून अधिक प्रतिष्ठीत  व्यक्तींनी केले आहे. जेंव्हा गरज पडेल तेंव्हा आर्थिक मदतही केली आहे.

अनेक आव्हानं झेलत आज सावली निराधार मुलांसाठी एक उत्तम सेवा करणारी संस्था असून एक मुलांचं हक्काचं, प्रेमाचं घर म्हणून नावारूपाला आली आहे. आव्हाने ही सतत येणारी प्रक्रिया आहे. सरकारी नियमांचे पालन करणे हे अजून एक आव्हान आहे. या नियमांनुसार सावलीला आत्ताची जागा खूप  कमी पडत आहे. सरकारी नियमानुसार सध्याची संख्या व  मुलांसाठी प्रयोगशील शिक्षण देण्यासाठी  सावलीला आता दुसऱ्या व मोठ्या जागेत जाणे अनिवार्य झाले आहे.

या साठीचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून सावली आता मोठ्या जागेत निराधार, एक पालक, स्थलांतरीत कुटुंबातील मुलांसाठी योग्य व्यवस्था करत आहे. पण लोक सहभागाशिवाय हे अशक्य आहे. हा सहभाग मुख्यत्वे  या क्षणी देणगी या स्वरूपातील आहे. पुढच्या टप्प्यात बांधकाम स्वरूपाचा आहे.

गेली तेवीस वर्ष लोकांनी दाखवलेला विश्वास आज पर्यंत शेकडो मुलांना आनंदी, समृद्ध आयुष्य देऊ शकला याचा आनंद आहे. आपल्याच आर्थिक सहयोगाने पुढील काळात हजारो गरीब निराधार मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण, दर्जेदार सुविधा मिळणार आहे याचा विश्वास आम्ही आपणास देत आहोत. आम्ही सावलीचे मुख्य विश्वस्त म्हणून सावलीला देणगीच्या रूपात मदत करावी हे आव्हान करत आहे. हे करण्याआधी सध्या सावलीच्या जागेस भेट देऊन, आत्ता पर्यंतचा प्रवास लक्षात घेऊन मग योग्य निर्णय वाचकांनी घ्यावा ही नम्र विनंती. 🙏

आपले स्नेहांकित
नितेश बनसोडे, प्रदीप जोशी, विनोद गांधी
सावली परिवार, अहमदनगर

संपूर्ण अंदाजपत्रकासह तपशीलवार प्रकल्प प्रस्ताव येथे पहा.

‘सावली’स आपले योगदान ८०जी अन्वये करसवलतीस पात्र आहे.  
संस्था नोंदणी क्र. F-6426
Bank details
Account name: Sankalp Pratishthan Axis bank, Tilak Road, Ahmednagar – 414 001.
Account no.: 913010004564483
IFSC Code:UTIB0000215. MICR code: 414211002

Links:

https://www.youtube.com/@savalee2465

https://www.facebook.com/share/p/tn9VSUKtsMfMt3du/?mibextid=Nif5oz

सावलीबद्दल पूर्वप्रकाशित पोस्ट्स :

अधिक माहिती साठी https://www.savalee.org/ या संकेतस्थळाला भेट देऊ शकता तसेच 9890969315 WhatsApp वर आपण संपर्क साधू शकता अथवा info.savalee@gmail.com इथे इमेल पाठवू शकता.

धन्यवाद!

Leave a comment