Et Cetera

II शिवकल्याणराजा II

निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू
श्रीमंत योगी II

नरपति हयपति गजपति
गडपति भूपति जळपति
पुरंदर आणि शक्ति
पृष्ठभागी II

यशवंत कीर्तिवंत
सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत नीतिवंत
जाणता राजा II

आचारशील विचारशील
दानशील धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील
सकळा ठायीं II

धीर उदार गंभीर
शूर क्रियेसि तत्पर
सावधपणे नृपवर
तुच्छ केले II

देव धर्म गोब्राह्मण
करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण
प्रेरणा केली II

या भूमंडळाचे ठायी
धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही
तुम्हा कारणे II

कित्येक दुष्ट संहारिला
कित्येकांसि धाक सुटला
कित्येकांस आश्रयो जाहला
शिवकल्याणराजा II

– संतश्रेष्ठ समर्थ रामदास स्वामी 

Leave a comment