Et Cetera

ओक्के मध्ये हाय…!

कोण नेता कोण अभिनेता कोण खलनायक

कोण भाडोत्री कोण दलाल कोण मालक

कोण प्रवासी कोण वाहक कोण चालक

कोण येतो कोण जातो कोण राहतो

कोण सांगतो कोण एकतो कोण पाहतो

कोण भरतो कोण उपसतो कोण नाहतो

कोण साधा कोण सोज्वळ कोण अनाडी

कोण सराईत कोण अट्टल कोण खिलाडी

कोण आगाडी कोण मधला कोण पिछाडी

कोण मूर्ख कोण मंद कोण हुश्शार

कोण कच्चा कोण पक्का कोण तय्यार

कोण पारधी कोण सावज कोण हत्यार

कोण साधा कोण सरळ कोण हिकमती

कोण नागपूर कोण मुबई कोण बारामती

कोण उथळ कोण बोलभांड कोण करामती

कोण रक्षक कोण भक्षक कोण हाकारे

कोण मतलई कोण खारे कोण न्यारे

कोण मी कोण तू कोण हे सारे…?

Leave a comment